५०० ग्राम मटण ध् चिकन चे तुकडे स्वच्छ धुवून आले लसून ची पेस्ट व दही लावून १ लिटर पाण्यात उकडावे.पूर्ण शिजल्यानंतर त्यातील पाणी (स्टॉक) वेगळया भांड्यात काढावे. एका कढाई मध्ये तूप किंवा तेल गरम करून घ्यावे. त्यात ३-४ मिरे, २-३ लवंगा, दालचिनी तुकडा, १-२ हिरवी वेलची यांची फोडणी द्यावी त्यात मिरचीचे तुकडे घालून वाघमारे पांढरा रस्सा मसाला (२५ ग्राम) घालून भाजावे,वेगळा ठेवलेला स्टॉक व खोबर्याचे दुध घालुन उकळावे, चवीपुरते मीठ घालावे.व्हेज पांढरा रस्सा करिता मिक्स भाज्यांचे उकळलेले पाणी (स्टॉक) वापरावे